Independence and *WE* kas

🇮🇳 सर्वप्रथम स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🇮🇳 Happy Independence Day 💐

स्वातंत्र आणि विकास
Independence and WEkas

आपल्या संविधानाची सुरुवात एका महत्वपूर्ण वाक्याने होते WE THE PEOPLE आणि ह्यातला WE हा मला ठळक नमूद करावासा वाटतो.

लवकरच देशात निवडणुकेचे वातावरण तापायला लागेल. गेल्या 70 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी विकास (VIKAS) ह्या मुलभूत गरजेचं राजकारण करत स्वतःचा विकास करून घेतला. आणि आजही ह्याच मुद्द्यावर तुम्हा आम्हाला भुलवल जात.

गेल्या काही वर्षात ह्यात एक गोष्टीची प्रकर्षाने भर जाणवते. ति म्हणजे इंग्रजानी घातलेल्या पायांड्याची divide and rule. बरेच राजकिय आणि निमराजकीय संघटना लोकांना लोकांपासून तोडण्याचा (धर्मावरून, जातीपाती वरून, समाजवरून, खाण्यावरून, कपडे घालण्यावरून आणि बरीच अशी विविधता जि आपल्या देशाची खरी ताकत हाती, आहे आणि राहिली पाहिजे) प्रयत्न करताना दिसत आहेत आणि हे सगळं चालतं एका शब्दांमागे तो म्हणजे विकास (VIKAS).

मि तुम्हाला विनम्र आठवण करून देतो आहे की…

  • विविध प्रांताच्या, जातीच्या, समाज्याच्या समस्थ स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र (WE) हे स्वातंत्र आपल्याला दिलं आहे,
  • आजवर देशाने जो विकास मिळवला आहे तो एकात्मतेची (WE) भावना जपत आणि पुढच्या पिढ्यानपिढ्याना देत मिळवला आहे,
  • स्वातंत्र्याची 100 वर्ष आणि त्यानंतरचा विकास हासुद्धा ह्या एकात्मतेवरच शक्य आहे.

तेव्हा VIkasachi भाषा करत तुम्हाला फसवण्याऱ्या राजकारण्यापासून सावध रहा.

स्वतःमध्ये WEkasachi जाणीव जिवंत राहू देत, ति तुमच्या आजूबाजूला पसरवा, त्यासाठी तुम्ही लोकांना प्रेरणा द्या आणि उज्ज्वल भारतासाठी तुमचा हातभार लावा.

त्यासाठी देव आपणा सर्वाना सद्बुद्धी आणि लागणार बळ देवो हि देवाकडे माझी प्रार्थना.

जय हिंद, वंदे मातरम, भारतमाता की जय !!!